शुद्धता, ताजेपणा आणि विश्वास – माणदेश बिग बाजारची खरी ओळख!

आमची सुरुवात (Our Story): माणदेशातील ग्राहकांना उत्तम दर्जाचा किराणा आणि सेवा देण्यासाठी ९ मार्च २०२१ रोजी ‘माणदेश बिग बाजार’ची स्थापना झाली. दहीवडीसारख्या ठिकाणी आधुनिक सेवा आणि पारंपरिक विश्वास यांचा मेळ घालत आम्ही हा प्रवास सुरू केला. आज आम्ही फक्त एक दुकान नाही, तर हजारो समाधानी ग्राहकांचा परिवार झालो आहोत.

आम्ही काय विकतो? (Our Products):

तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व काही एकाच छताखाली (आणि आता एका क्लिकवर) उपलब्ध केले आहे:

  • संपूर्ण किराणा: उत्तम दर्जाचे धान्य, तांदूळ, डाळी, कडधान्ये, तेल आणि तूप.

  • मसाले आणि ड्रायफ्रुट्स: अस्सल चवीचे खडे मसाले, मिरची आणि पौष्टिक सुकामेवा.

  • ब्रँडेड वस्तू: चॉकलेट्स, बिस्किटे, साबू, डिटर्जंट, टूथपेस्ट (कोलगेट इ.) आणि कॉस्मेटिक्स.

  • गृहउपयोगी वस्तू: प्लास्टिकचे सामान आणि घरासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तू.

माणदेश बिग बाजारच का? (Why Choose Us?) इतर दुकानांपेक्षा आणि ऑनलाईन साईट्सपेक्षा आम्ही वेगळे आहोत, कारण:

१. स्वच्छतेची हमी (Hand-Cleaned Quality): बाजारात मिळणारे पॅकेट अनेकदा थेट मशीनने पॅक होतात, पण आमची पद्धत वेगळी आहे. आमच्या गोडाऊनमध्ये आमचा महिला कर्मचारी वर्ग (Ladies Staff) शेंगदाणे, पोहे, डाळी आणि धान्य स्वतः निवडून आणि साफ करूनच पॅकिंग करतात. त्यामुळे तुम्हाला मिळणारा माल हा १००% स्वच्छ आणि भेसळमुक्त असतो.

२. नेहमीच ताजा माल (Always Fresh): आम्ही मालाचा मोठा साठा करून ठेवत नाही. ग्राहकांना नेहमी ताजे जिन्नस मिळावेत म्हणून आम्ही फक्त पुढील १० दिवसांत लागेल एवढाच फ्रेश स्टॉक मागवतो. त्यामुळे जुना किंवा खराब झालेला माल तुम्हाला कधीच मिळणार नाही.

३. दहीवडीत सर्वात माफक दर (Best Rates): उत्तम कॉलिटी असूनही आमचे दर संपूर्ण दहीवडीमध्ये सर्वात कमी आणि वाजवी आहेत, याची आम्ही खात्री देतो.

४. प्रामाणिक सेवा (Honest Service): आमचा सर्व स्टाफ ग्राहकांना विनम्र आणि प्रामाणिक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. तुमची ऑर्डर अचूक आणि सुरक्षितरीत्या तुमच्यापर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे.

होम डिलिव्हरी (Delivery Area): आता घरबसल्या ऑर्डर करा! आम्ही दहीवडी शहरापासून २० किलोमीटरच्या परिसरात होम डिलिव्हरी सेवा देतो. तुम्ही दहीवडीत असा किंवा आसपासच्या गावात, तुमचा किराणा तुमच्या दारापर्यंत पोहोचेल.

आमचे ध्येय (Mission): “भेसळमुक्त, स्वच्छ आणि ताजा किराणा प्रत्येक घरात पोहोचवणे आणि ग्राहकांचा वेळ व पैसा वाचवणे.”